
अमळनेर : तालुक्यातील मुडी प्र डांगरी येथील सरपंच मंदाबाई भाऊराव पाटील अखेर ग्रामसभेत देखील २९४ मतांनी पायउतार झाल्या आहेत. अध्यासी अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी काम पाहिले त्यांना तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सहकार्य केले.

सरपंच गावासाठी वेळ देत नाही यासह इतर कारणांनी ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. अविश्वास ठराव मंजूर केल्यानन्तर जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मे रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. यात मतदान घेण्यात आले. ७६६ ग्रामस्थांनी मतदानात सहभाग घेतला. त्यापैकी ५१४ ग्रामस्थांनी अविश्वासाच्या बाजूने तर २२० ग्रामस्थांनी अविश्वासाच्या विरोधात मटफं केले. ३२ मते बाद झाली.
५ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली. किमान १०० नागरिक सभेला उपस्थित आवश्यक असतात. सभेनंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. तीन मतदान केंद्र होते. चार वाजेपर्यंत मतदान सुरू होते. चार वाजेनंतर मतमोजणीला सुरुवात झाली. अविश्वास ठरावाच्या बाजूने ५१४ तर विरोधात २२० मते पडली. मतमोजणी प्रक्रियेसाठी ग्रामसेवक पंकज पाटील , डिगंबर सैंदाणे , अविनाश पाटील , राहुल पाटील , सुभाष भोई , नितीन पाटील , इच्छाराम बाविस्कर , अशोक पाटील यांनी सहकार्य केले.
अविश्वास ठरावाचा निकाल जाहीर होताच युवकांनी व गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान जोपर्यँत लोकनियुक्त सरपंचपदाची निवडणूक होत नाही तोपर्यंत उपसरपंचना पदभार देण्यात आला आहे.




