
अमळनेर:- अमळनेरचा ऐतिहासिक वारसा असलेला दगडी दरवाजा पुन्हा ढासळला असून याबाबत नागरिक आता संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.
गेल्या अनेक दिवसापासून दगडी दरवाज्याचे काम सुरू असून संथगतीने सुरू असलेल्या या कामाबद्दल याआधी ही अनेकांनी लेखी तक्रारी केल्या आहेत. काल दुपारी अचानक नवीन केलेल्या कामाचा एका बाजूचा भाग कोसळल्याने दोन कामगार किरकोळ जखमी झाले. हे काम गुणवत्तापूर्ण होत आहे की नाही याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. असेच काम सुरू राहिल्यास पुन्हा मोठा भाग कोसळून जीवितहानी झाल्यास त्यास कोण जबाबदार राहील असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. एकंदरीत ठेकेदार, पालिका व पुरातत्व विभागाच्या खेळात शासनाच्या पैश्याची माती होत आहे.







