
व्हाईस चेअरमनपदी हिरामण पाटील यांची निवड…
अमळनेर:- तालुक्यातील लोण ग्रुप विकासो सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने 9 जागेवर विजय मिळवला. यावेळी चेअरमनपदी निवृत्त मंडळाधिकारी एन टी पाटील यांची निवड झाली असून व्हाईस चेअरमनपदी हिरामण साहेबराव पाटील यांची निवड झाली आहे.
यावेळी भगवान राजधर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र दगडू पाटील, संगीता शांताराम पाटील, कमलबाई साहेबराव पाटील, विमलबाई निंबाजी पाटील, बंडू शिवाजी पाटील, गिरीश प्रकाश पाटील, सुभाष पराग राठोड, सुका वना भिल आदी उपस्थित होते. तसेच किसन देवराम पाटील,शिवाजी नथु पाटील, काशिनाथ शामराव पाटील, विश्वास बाजीराव पाटील, सुशील पाटील,वसंत राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून भुषण बारी यांनी काम पाहिले संस्थेचे सचिव कृष्णकांत भावसार यांनी सहकार्य केले. व मारवड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला




