
चेअरमनपदी मगन पाटील, व्हाइस चेअरमनपदी बळीराम चौधरी यांची निवड…
अमळनेर:- तालुक्यातील निम येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून चेअरमन व व्हॉईस चेअरमनपदी ही सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी चेअरमन पदी मगन वामन पाटील यांची व्हाइस चेअरमन पदी बळीराम रामकृष्ण चौधरी यांची निवड करण्यात आली. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांत प्रविणकुमार गोरखनाथ चौधरी, गुलाब लोटन पाटील, पंढरीनाथ भावलाल चौधरी, छोटू ताराचंद पाटील, नामदेव प्रताप पाटील, हिलाल छन्नु कोळी, आनंदा खंडू धनगर, विनोद अंबादास चौधरी, श्रीमती शानुबाई लोल्लु पाटील, श्रीमती सखुबाई भगवान चौधरी, श्रीमती भारतीबाई राजेंद्र चौधरी यांचा समावेश आहे. बिनविरोध व सर्वानुमते निवड केल्याने ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.







