
महिलेने मारवड पोलीसात केली तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील बोहरा येथील माहेर असलेल्या विवाहितेने सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार मारवड पोलीसात दाखल केली आहे.
तालुक्यातील बोहरा येथील माहेर असलेल्या श्रद्धा अविनाश बाविस्कर या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, २२ एप्रिल २०२१ रोजी लग्न झाल्याच्या १५ दिवसापासून ते आजपावेतो उमया नगर, नवागाम दिंडोली उधना येथे सासरी पती अविनाश बाविस्कर, सासू अरुणाबाई शांताराम बाविस्कर, जेठ निलेश शांताराम बाविस्कर, जेठाणी सपना निलेश बाविस्कर यांनी गहाण ठेवलेले घर सोडविण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावे यासाठी वेळोवेळी तगादा लावला तसेच फारकत घेण्यासाठी मारहाण व मानसिक छळ केला म्हणून फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मारवड पोलीसात भादवि कलम ४९८ अ, ३२३,५०४,५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सपोनि जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.हे. कॉ. मुकेश साळुंखे हे करीत आहेत.







