
पंतप्रधान मोदींसह विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या सद्भावना…
केंद्र, महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारने केली मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा…
अमळनेर:- इंदोरवरून अमळनेर कडे येणारी अमळनेर डेपोची बस मध्यप्रदेशातील धार जिल्ह्याजवळ नर्मदा नदीवरील पुलावरून खाली कोसळून १२ जण मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना काल सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यातून शोककळा व्यक्त होत आहेत.
इंदोर कडून येणारी अमळनेर आगाराची बस क्रमांक एमएच ४० एन ९८४८ ही सकाळी १० ते १०:१५ वाजेदरम्यान मध्य प्रदेश मधील खलघाट आणि ढीकरी मधील नर्मदा नदीच्या पुलावरून नर्मदा नदी कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नऊ पुरुष व तीन स्त्रियांचा समावेश आहे.
यात अमळनेर तालुक्यातील पाच जणांचा समावेश असून यात वाहक प्रकाश चौधरी, चालक चंद्रकांत एकनाथ पाटील, पाडळसरे येथील अविनाश संजय परदेशी, पिळोदा येथील निंबाजी आनंदा पवार, अमळनेर येथील माहेर असलेल्या अरवा मुर्तुझा बोहरी यांचा समावेश आहे. तसेच धुळे जिल्ह्यातील विरदेल येथील विकास सतीश बेहेरे (वय ३३), बेटावद ता. शिंदखेडा येथील कल्पनाबाई गुलाबराव पाटील (वय ५७) यांच्यासह राजू तुळशीराम रा. रावतफाटा (राजस्थान), जगन्नाथ जोशी रा. मुकामपुर (राजस्थान), चेतन जगिड रा. जयपूर (राजस्थान), रुक्मिणीबाई जोशी रा. बागोर (राजस्थान), सैफुद्दिन बोहरा रा. इंदोर (म. प्र.) यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींसह मान्यवरांनी व्यक्त केल्या शोककळा…

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मयतांच्याप्रती अनेकांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.पंतप्रधान कार्यालयाने यावर ट्विट केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म. प्र. मुख्यमंत्री शिवराज चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे यांसह आमदार अनिल पाटील व विविध नेते, मान्यवर तसेच संपूर्ण महाराष्ट्र भरातून या दुर्दैवी घटनेबाबत शोककळा व्यक्त होत आहेत.
मृतांच्या वारसांना मदतीची घोषणा…
मध्यप्रदेशात झालेल्या इंदोर-अमळनेर एसटी बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार च्या वतीने २ लाख प्रत्येकी, महाराष्ट्र सरकारच्या वतीने एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने १० लाख प्रत्येकी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ४ लाख आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

