अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. 24 सप्टेंबर रोजी “राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस ” साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेविका कु. नाजमीन खान हीने केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी आपल्या प्रास्ताविकातून सर्व स्वयंसेवकांना रासेयो स्थापनेमागील मुख्य उद्देश सांगून स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. माधव वाघमारे तर प्रमुख अतिथी म्हणून अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सतिश पारधी हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा. विजय पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे हे होते.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सतिश पारधी यांनी आपल्या भाषणातून रासेयो स्थापनेचा इतिहास सांगून, स्वयंसेवकांनी उस्फुर्तपणे केलेल्या समाजसेवी कार्याची माहिती दिली. तर अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी रासेयो योजनेची कार्यपद्धती व भविष्यातील फायदे सांगून, विद्यार्थ्यांना या स्वयंसेवी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रासेयो स्वयंसेविका कु. वैष्णवी महाजन हिने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाने बहुमोल सहकार्य केले.