
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील निवृत्ती पाटील नवोदय परीक्षा उत्तीर्ण झाला असून पुढील शिक्षणासाठी भुसावळ नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.
सु.हि.मुंदडे हायस्कुल येथील विद्यार्थी चि.निवृत्ती पुनिलाल पाटील हा नवोदय परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची साकेगाव ता. भुसावळ याठिकाणी पुढील शिक्षणासाठी निवड झाली. त्याला शिक्षक ज्ञानेश्वर साळुंखे व आई वडिलांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे आई व वडील यांनी आचारी व्यवसाय सांभाळुन मुलाला योग्य मार्गदर्शन केले. त्याच्या या निवडीबद्दल ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथील अध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.







