
आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या तयारीला वेग…
अमळनेर:- काल दिनांक २८ रोजी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे इच्छुकांनी आता मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील इंदिरा भवन येथे प्रांत सीमा अहिरे व तहसीलदार वाघ यांच्या उपस्थितीत दहा गणांचे आरक्षण काढण्यात आले.
गणांचे आरक्षण पुढील प्रमाणे
कळमसरे – सर्वसाधारण
प्र. डांगरी – सर्वसाधारण स्त्री
अमळगाव – सर्वसाधारण
पातोंडा – सर्वसाधारण स्त्री
दहीवद – अनु. जमाती स्त्री
सारबेटे – ना. मा. प्र. स्त्री
मांडळ – सर्वसाधारण
मुडी प्र. डा. – ना. मा. प्र.
जानवे – अनु. जाती. स्त्री
मंगरूळ – अनु. जमाती
तसेच तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जळगांव येथे काढण्यात आले ते पुढील प्रमाणे
दहिवद गट – एसटी
मांडळ गट – जनरल
जानवे गट – जनरल
कळमसरे गट – जनरल
पातोंडा गट – एस सी महिला राखीव