अमळनेर:- शहरातील १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना २७ जुलै रोजी घडली असून अमळनेर पोलीसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सचिन अहिर यांच्या मित्राची १५ वर्षीय मुलीला दिनांक २७ जुलै रोजी संध्याकाळी ४:३० वाजेच्या सुमारास साने गुरुजी शाळेच्या मागील गेटच्या रोडवरून अज्ञात इसमाने फुस लावून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. सदर मुलगी सडपातळ बांध्याची, पाच फूट उंची, रंग गव्हाळ, अंगावर गुलाबी रंगाचा टॉप, निळी जीन्स व सोबत निळ्या रंगाची बॅग असून ह्या वर्णनाची मुलगी दिसून आल्यास अमळनेर पोलीसात संपर्क साधण्याचे आवाहन पो. नि. जयपाल हिरे यांनी केले आहे.