
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथे गावठी दारू विक्रेत्यास मारवड पोलिसांनी रंगेहाथ पकडलं कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निंभोरा गावात गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांनी छापा टाकला असता रामचंद्र महादू कोळी रा. निंभोरा हा चिखली नदीकाठी स्मशानभूमीच्या बाजूला गावठाण जागेत दारू विक्री करताना रंगेहाथ आढळून आला. त्याच्याकडे १२०० रुपये किमतीची ३० लिटर दारू मिळून आली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. आरोपीविरुद्ध मु.प्रो. ॲक्ट ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ. विशाल चव्हाण हे करीत आहेत.