अमळनेर:- रेल्वे स्थानकावर काल ३१ जुलै रोजी दुपारी दीड सुमारास २२ वर्षीय तरुणाने धावत्या मालगाडीखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मृत तरुणाचे नाव राजेश मधुकर वानखेडे असुन तो धुळे येथे महानगरपालिकेत कार्यरत होता. त्याचे मुळगाव लोखंडा ता.खामगाव जि.बुलढाणा आहे. तो गेल्या दीड महिन्यापासून अमळनेर येथील बंगाली फाईल येथे आई-वडिलांसह वास्तव्यास होता. सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पाहणी केली असता सदर तरुण मृत अवस्थेत आढळून आला. तातडीने त्याच्या नातेवाईकांना बोलण्यात आले. मृत व्यक्तीचे शव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी हलविण्यात आले. राकेशच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून पुढील तपास पो.ना. हिरालाल चौधरी व पो.ना. हेमंत ठाकूर हे करीत आहेत.