अमळनेर:- तालुक्यातील भरवस येथे ३५ वर्षीय शेतकऱ्याने तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना ३० जुलै रोजी रात्री घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ३० जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भरवस येथील सुनील लोटण पाटील याने इमिडागोल्ड नावाचे विषारी तणनाशक प्राशन केले. त्यास रात्रीच घरच्यांनी अमळनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान रात्री १२:३० वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर त्यास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आले. मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ. किशोर पाटील हे करीत आहेत. खाजगी व सावकारी कर्जामुळे सदर शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.