शिंदखेडा:- धावत्या रेल्वेतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ओडिशा येथील युवकाला भडणे येथील पोलिस पाटील युवराज माळी यांच्या मदतीने नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओडिशा राज्यातील युवक नारायण गुंड याने रेल्वेतून जात असताना भडणे गावानजीक चालत्या रेल्वेतून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो जखमी झाल्याने व्यायाम करत असलेल्या युवकांना दिसून आला. त्या युवकांनी पोलीस पाटील युवराज माळी यांच्याशी संपर्क साधत झालेल्या घटनेची माहिती दिल्याने युवराज माळी यांनी सदर तरुणाच्या नातेवाईकांशी तसेच शिंदखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत गोरावडे यांच्या संपर्क साधत याबाबत माहिती दिली. त्यानंतर युवकाला पोलीस ठाण्यात घेवून गेल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.