अमळनेर:- येथील महेश पाटील यांची युवक काँग्रेस युनिट मॅनेजमेंट विभागीय समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे.
महेश दगडू पाटील हे अमळनेर तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असून त्यांची युवक काँग्रेस युनिट मॅनेजमेंट मराठवाडा विभागीय समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले व प्रशासन व कार्यालयीन कामकाज प्रमुख श्रीनिवास नालामवर यांच्या आदेशाने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. महेश पाटील हे अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करत असून त्यांची या पदावर नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.