अमळनेर:- तालुक्यातील मारवड विविध कार्यकारी सोसायटीच्या (2022 ते 2027 ) पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने बहुमताने सत्ता स्थापन केली.
शेतकरी विकास पॅनल व प्रगति शेतकरी पॅनल यांच्यात सरळ लढत झाली होती. यात 13 पैकी 10 जागांवर विजय मिळवून शेतकरी विकास पॅनल सत्तेवर आले.
काल 5 ऑगस्ट रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली चेअरमन पदी राकेश गोविंद मुंदडा व व्हॉईस चेअरमन पदावर गुलाब गंगाराम पाटील (गोवर्धन )यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर नूतन पदाधिकारी निवड प्रसंगी संस्थेचे संचालक शरद वामनराव पाटील, दिलीप गुलाबराव पाटील, अनिल साहेबराव पाटील, सुदाम शामराव शिंदे, संजय पुना पाटील, संजय भगवान पाटील, ताराबाई वसंतराव पाटील, श्रीमती आनंदीबाई भिका चौधरी, एकनाथ ओंकार बाविस्कर, उमेश जिजाबराव सुर्वे, पंकज कांतीलाल लोहार हे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्हि. एम.जगताप व सुनिल महाजन यांनी कामकाज पाहिले. संस्थेचे सचिव सुनील पाटील लिपिक अनिल पाटील यांनी सहकार्य केले. याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप चौधरी सर यांनी तर आभार दिनेश साळुंखे यांनी मानले.