
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर – देश चालविण्यासाठी एक आधारभूत अस संघटन असते आणि हे संघटन लोकशाहीच्या माध्यमातून जुळले जाते. आणि ही लोकशाही आधारली आहे ती मतदान निवडणूक प्रकियेवर. या निवडणूक प्रकियेची माहिती शालेय विद्यार्थ्यांना अनुभवण्यासाठी येथील श्री दत्त विद्या मंदिर शाळेतील इयत्ता सातवीचे वर्ग इतिहास विषय शिक्षक प्रदिप लोहारे यांनी इयत्ता सातवीच्या वर्गात लोकशाही पध्दतीने वर्गप्रमुखाची निवड करीत विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची ओळख करून दिली.
निवडणूक प्रकियेत सातवीच्या वर्गातून वर्गप्रमुखाच्या निवडीकरीता पार्थ बिरारी, राज शिंदे, जान्हवी बिरारी, खुशी कुंभार , सुकन्या सुतार , रितेश पारधी , डिम्पल लोहारे , वैष्णवी गायकवाड , अंकिता लांबोळे आदी विद्यार्थ्यांनी नामांकन दाखल केले. वर्ग शिक्षक प्रदिप लोहारे यांनी माघार घेणे , बिनविरोध प्रक्रिया पार पाडणे , गुप्त मतदान करणे, नोटा मतदान , मतमोजणी व निकाल प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. सर्व उमेदवारांना माघार घेण्याकरीता वेळ देण्यात आली. परंतू कुणीही माघार न घेतल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध न करता होता गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यावेळी सातवीच्या वर्गातील 21 मुले व 29 मुली असे एकूण 50 विद्यार्थी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी अंती सर्वात जास्त 23 मते मिळवून राज शिंदे याची वर्गप्रमुख तर दुस-या क्रमांकाची 14 मते मिळवून रितेश पवार याची उपवर्गप्रमूख पदी निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य प्रदिप शिंगाणे, पर्यवेक्षक व्हि.सी.पाटील , वर्गशिक्षक प्रदिप लोहारे व उपशिक्षक शरद सोनवणे यांनी चाॅकलेट देऊन अभिनंदन केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनी भाग्यश्री सोनवणे, निशा भोई , रोहिणी भोई , तेजस्विनी बिरारी , प्रियंका पाटील यांनी निवडणूक कर्मचारी म्हणून प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य केले. या प्रसंगी उपशिक्षीका सुनंदा पारधी व भुषण बिरारी उपस्थित होते.
प्रतिक्रिया:-
“आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरीक असून त्यांच्यामधे लोकशाही निवडणूक प्रक्रियेची मुल्यं रूजावीत म्हणून दरवर्षी वर्गप्रमुखाची निवड लोकशाही पध्दतीने करण्यात येते.” –प्रदिप लोहारे, उपशिक्षक श्री दत्त विद्या मंदिर पातोंडा







