
अमळनेर:- सामाजिक बांधिलकी म्हणून खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेने (PTA) अमळनेर बस दुर्घटनेत पितृ छत्र हरपलेल्या कु.कोमल चौधरीची शैक्षणिक जबाबदारी घेतली आहे.
अलीकडेच घडलेल्या दुर्दैवी घटनेत, बस अपघातात अमळनेर तालुक्यातील 5 लोकांचा समावेश होता. अमळनेर आगारात वाहक असलेले प्रकाश चौधरी सदरील दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडले होते. प्रकाश चौधरी यांची कन्या कु. कोमल चौधरी या विद्यार्थिनीची अमळनेर कोचिंग क्लासेस संघटनेने इ.11वी व 12वी ची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी उचललेली आहे. उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या कार्यालयात क्लासेस संघटना अध्यक्ष भैय्यासाहेब मगर सर यांनी तशी अधिकृत घोषणा केली. यावेळी मा.सीमा अहिरे मॅडम यांच्या हस्ते कु.कोमल चौधरीला शैक्षणिक साहित्य देण्यात आले.यावेळी कोमलचे पालक(काका) निलेश चौधरी
तसेच क्लासेस संघटना(PTA) अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, श्री फिजिक्स क्लासेसचे महेश बढे, सुमन अकाँटन्सी व केमिस्ट्री
क्लासेसचे चंदुलाल बडगुजर,योगीराज क्लासेसचे शिरीष डहाळे सर,अर्जुन बायोलॉजी क्लासेसच्या सोनल जोशी मॅडम तसेच एसटी महामंडळाचे कर्मचारी मनोज पाटील उपस्थित होते.







