अमळनेर:- तालुक्यातील धार येथे पिरबाबाच्या यात्रेतून दुचाकी लांबविल्याचा प्रकार घडला असून मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कसाली मोहल्ला भागातील युवक अर्शद शाहिद पठाण हा धार येथे यात्रा पाहायला गेला होता. त्यावेळी त्याने आपली दुचाकी काळ्या रंगाची स्प्लेंडर प्रो (एमएच १९ बीपी ६१८८) ही गाडी पिरबाबा दर्गाच्या दक्षिणेस सिमेंटच्या पायरीच्या कडेला लावली होती. यात्रा पाहून परत आल्यावर दुचाकी न दिसल्याने आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र काहीच तपास न लागल्याने मारवड पोलीसात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.