
व्हा. चेअरमनपदी उषाबाई धनगर यांची निवड…
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून चेअरमनपदी कृषिभूषण सुरेश पिरन पाटील तर व्हॉईस चेअरमनपदी उषाबाई धनगर यांची निवड करण्यात आली.
निंभोरा विकासो निवडणूकीत सुरेश पाटील यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने बाजी मारत सर्व जागा जिंकल्या होता. या चेअरमन व व्हॉईस चेअरमन निवडी प्रसंगी संचालक चिमणराव पाटील, छायाबाई पाटील, रजुबाई पाटील, राजेंद्र वाडेकर, राजेंद्र पाटील, जगदीश पाटील, कैलास पाटील, सुनंदा पाटील, बाजीराव पाटील, रातीलाल कोळी, उषाबाई कोळी, राजेंद्र वाडेकर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल येवले व सेक्रेटरी विलास पाटील यांनी कामकाज पाहिले यावेळी किशोर पाटील, वणाबापू पाटील, गुलाब पाटील, विजय वाडेकर, जगदीश पाटील, रवींद्र पाटील, आलेश न्हाळदे, तुषार न्हाळदे, दीपक पाटील, लक्ष्मीकांत पाटील, पंकज पाटील, किरण पाटील यासह ग्रामस्थ उपस्थित होते.







