
कोरोनात मृत दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखाच्या धनादेशाचे वितरण…
अमळनेर:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमळ्नेर येथील नगरपरिषद कार्यालयात अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आमदार अनिल पाटील व अमळनेर नगर परिषदेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या शुभहस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव, माजी नगराध्यक्ष व खाशि संचालक विनोद भैय्या पाटील, खाशि संचालक डॉ. अनिल शिंदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, अभियंता दिगंबर वाघ व इतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी कोविड मध्ये निधन झालेल्या अमळनेर नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश आमदार अनिल दादा पाटील, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. मयत कर्मचारी वसंत लोटन पाटील (पाणी पुरवठा विभाग) यांच्या पत्नी संगीता वसंत पाटील यांना तसेच मयत कर्मचारी गोकुळ सुकलाल संदानशिव यांच्या वारस मीनाक्षी गोकुळ संदानशिव यांना धनादेश वितरित करण्यात आला.







