हतनूर व तामसवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू…
अमळनेर:- हतनूर व तामसवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बोरी व तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दि. ०९ ऑगस्ट रोजी बोरी मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी 266.95 मी असून सकाळी 2.30 वाजता धरणाचे 11 दरवाजे 0.30 मीटर, 01 दरवाजा 20 मीटर, 01 दरवाजा 10 मीटरने उघडून 10836 क्युसेक् विसर्ग नदी पात्रात सुरु असून विसर्ग वाढवण्यात आला आहे.
हतनुर धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे 41 पैकी 16 गेट पूर्ण उंचीने उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत 42272 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तसेच रात्रीतून विसर्ग वाढविण्यात येणार होता. तरी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी
असे आवाहन जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.