दोन जखमी, मारवड पोलिसांत तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील रंजाणे गावाजवळ दोन दुचाकीचा अपघात होवून दोन जखमी झाल्याची घटना दिनांक २० रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी बेजबाबदारपणे दुचाकी चालवणाऱ्या एकाविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
फिर्यादी विजय पाटील रा. हींगोणे हे भिकन रसूल पिंजारी यांना डबलसीट घेवून अमळनेर हून गावी हींगोणेकडे जात असताना रंजाणे गावाजवळ जयेश बाळू पाटील (रा. अंतूर्ली) हा अंतूर्लीकडून येत असताना भरधाव वेगात पांढऱ्या चारचाकीला ओव्हरटेक करून फिर्यादीच्या वाहनाला धडक दिली. यात फिर्यादी व त्याच्या मागे बसलेले असे दोन्ही जखमी झाले असून दुचाकीचे ही नुकसान झाले आहे. त्यावरून मारवड पोलिसांत भादवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ मो.व्हे.ॲक्ट १८४ अन्वये नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे. कॉ. संजय पाटील हे करीत आहेत