पिडीता गर्भवती राहिल्याने मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील प्रगणे डांगरी येथे लहान भावाच्या विधवेसोबत जेठणे जबरदस्ती संबंध ठेवून पीडिता गर्भवती झाल्याने सासरच्या मंडळींनी मारहाण केली. त्यावरून मारवड पोलीसात चार जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पीडित २६ वर्षीय विधवा महिलेचा पती किडनी आजाराने मयत झाल्याने तीन वर्षांचा मुलासह सासू सासरे व जेठ जेठाणी सोबत राहत होती, पत्नी माहेरी गेल्याची संधी साधून जेठाणे मुली समान भावजयीकडे शरीर सुखाची मागणी केली. तीस विधवा भावजयीने विरोध केल्याने तीन वर्षांचा तुझ्या मुलाला मारून टाकण्याची धमकी देत पीडितेच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. माहेरी आई वडील भाऊ बहीण कोणीच आधार नसल्याने सासू व जेठाणीला जेठ गोपाल भोई यांनी केलेल्या बलात्काराची वरील हकीकत सांगितली असता त्यांनी मिळून शारीरिक व मानसिक छळ करीत पोटावर मारहाण केली. काही दिवसांनी उलट्या होऊ लागल्या व मासिक पाळी बंद झाल्याने गरोदरपणाचे लक्षात आले असता दिनांक ५ ऑगस्ट रोजी सासू व जेठाणी हीने चरित्रावर संशय व्यक्त करीत मारहाण केली असता सासरे व जेठ दोन्ही आले व चारही जणांनी मिळून पीडित महिलेला पोटावर हाताबुक्यांने जोरजोरात मारहान केल्याने बेशुद्ध पडली असता दिनांक ६ ऑगस्ट रोजी पिडीता सकाळी ८ वाजता शुद्धीवर आली असता ती धुळे येथील जिल्हा रुग्णालयात असल्याचे समजले. याबाबत धुळे शहर पोलिसांत फिर्याद दिली होती ती शून्य क्रमांकाने मारवड पोलीस ठाण्यात वर्ग होऊन काल दिनांक १० ऑगस्ट रोजी रात्री उशिरा सासू कलाबई खंडू भोई, सासरे खंडू भीमा भोई, मुख्य आरोपी जेठ गोपाळ खंडू भोई व जेठाणी मनीषा गोपाळ भोई सर्व राहणार प्रगणे डांगरी ता अमळनेर यांचे विरुद्ध बलात्काराची चार कलमे व संगनमताने सामूहिक मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणे अशी एकूण आठ कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीएसआय विनोद पाटील हे घटनेचा तपास करीत असून दिनांक ११ रोजी सकाळी १० वाजता पोलीस डांगरी गावात दाखल होऊन पोलीस पाटील पंजाबराव वाडीले यांच्या मदतीने मुख्य आरोपी गोपाळ खंडू भोई दुपारच्या सुमारास शेतातून ताब्यात घेवून अटक करण्यात आली. त्यास न्यायालयात हजर केले जाईल असे तपासी अधिकारी विनोद पाटील यांनी सांगितले. सदर पिडीत विधवा महिलेला कोणाचाच आधार नसल्याने तिला जळगाव येथील आशादीप महिला संरक्षण केंद्रात रवाना करण्यात आले आहे.