आदिवासी तरुणांनी पर्यावरण संरक्षणाची घेतली शपथ…
अमळनेर:- दंडनायक राजपुत्र वीर एकलव्य जयंतीनिमित्त आदिवासी दिवस म्हणून पाडळसरे, कळमसरे,बोहरे येथे आदिवासी बांधवांनी भव्य मिरवणूक, फलक अनावरण, भंडारा व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. पाडळसरेत सुरुवातीला वीर एकलव्य व भगवान शंकराची प्रतिमापूजन विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील यांच्या हस्ते करून माजी सरपंच रूपाबाई भिल्ल, माजी उपसरपंच रवींद्र पाटील यांनी श्रीफळ वाहून माल्यार्पण केले गावातील शेकडो आदिवासी बांधव तसेच महिला वर्ग एकत्रित येऊन राजपुत्र एकलव्य सेना मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांनी आदिवासी दिन साजरा केला.
जुन्या व नवीन पुनर्वसित गावात राजपुत्र एकलव्य प्रतिमेची सजविलेल्या ट्रॅक्टरवर भव्य मिरवणूक काढण्यात आली नंतर फीत कापून शाखा उद्घाटन व फलक अनावरण थाटात संपन्न झाल्यावर एकलव्य सेनेचे किशोर मालचे यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी सरपंच रुपाबाई भिल, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, अभिमन कोळी, दिलबर भिल, विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी उपस्थित आदिवासी बांधवानी पर्यावरण संरक्षण करण्यासाठी शपथ घेतली तर आधार भिल, तुकाराम भिल, दीपा नाईक, इंदल भिल, बुधा नाईक, बाबू नाईक, चंदा नाईक, संतोष भिल,सदाशिव भिल, बापू भिल, बन्सी भिल, पिंटू भिल, मुकेश भिल,सुनील भिल, सोपान भिल,अरुण भिल, महारु भिल, सुदाम भिल, सुनील भिल, रोहिदास भिल्ल आदींनी परिश्रम घेतले. तर कळमसरे येथे गणपती मंदिर प्रांगणात मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने व किशोर मालचे, उपसरपंच जितेंद्र राजपूत, विकास सोसायटीचे चेअरमन बाबूलाल पाटील यांनी प्रतिमापूजन करून माल्यार्पण केले. वीर एकलव्याचा भूमिकेत गोपाळ राजू भिल याचे ही यावेळी पुजन करून गावात डीजे व ढोल ताश्याचा गजरात सजविलेल्या ट्रॅक्टर वरून भव्य मिरवणुकीत घराघरातून पूजन करण्यात आले. मिरवणुकीत आदिवासी युवक व युवतींनी आदिवासी गीतावर नृत्य सादर केले. नंतर महाप्रसाद वाटून भक्तांना दर्शनाचा लाभ घेतला यावेळी भिल राजपुत्र एकलव्य सेनाचे किशोर मालचे, रवींद्र भिल सचिव विलास भिल सल्लागार आबा भिल, देविदास भिल, अनिल भिल, रघुनाथ भिल, गणेश भिल,राहुल भिल, किरण मंगल भिल, राजू भिल, अनिल भिल, श्याम भिल आदींचे सहकार्य लाभले. व बोहरे येथेही विर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गावातून ट्रॅक्टर वर मोठ्या जल्लोषात वीर एकलव्य प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सर्व समाज बांधवांनी उत्साहात सहभाग घेतला. यावेळी विर एकलव्य मित्र मंडळाचे रवि मालचे,गणेश भिल,देविदास भिल,फूला भिल, गैदल भिल, बापु भिल, हर्षल सैदाणे, प्रवीण भिल, सोमनाथ भिल, सुकदेव मालचे, मंगल महाराज, विजु महाराज आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान राजपुत्र वीर एकलव्य जयंतीच्या दिवशी सर्व मजूर वर्ग कामावरून घरीच असल्याने भंडारा आयोजित करून महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले, कोणाकडून आर्थिक मदत न घेता गावातील आदिवासी बांधवांनी महिनाभर मोल मजुरी करीत पैसे साठवून महाप्रसाद साठी देणगी देऊन हा कार्यक्रम आयोजित केल्याने तरुण आदिवासी बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमास परिसरातील पाडळसरे, निम, बोहरे, तांदळी, शहापूर, वासरे, खर्दे, गोवर्धन, मारवड, डांगरी, सात्री आदी गावातील आदिवासी बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती.