अमळनेर:- तालुक्यातील एकरूखी येथे दत्तक गावी पंडित जवारलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी एकरुखी गावाच्या सरपंचा मनीषा भिल उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपसरपंच सुरेश पाटील, ग्रामसेविका वैशाली पाटील, श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे संचालक अभिजीत भांडारकर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पी एस पाटील, पारोळा विभागीय समन्वयक डॉ. जगदीश सोनवणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अस्मिता सरवैया, डॉ. श्वेता वैद्य, प्रा डी आर ढगे, राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. विजयकुमार वाघमारे उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका, व त्यांचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. सर्व प्रथम राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या निवासी शिबिराचे उद्घाटन मान्यवरांनी सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून केलें. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तथा शिबिर समन्वयक डॉ. अस्मिता सरवैया यांनी केले. आपल्या प्रास्ताविकेतून त्यांनी सांगितले की, या सात दिवसाच्या निवासी शिबिरात एकच ध्यास विद्यार्थी विकास आणि ग्रामविकास साध्य करण्यासाठी विद्यापीठ आणि जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून या सात दिवसात दैनंदिन कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बौद्धिक मेजवानीसाठी दर्जेदार व्याख्यातांना आमंत्रण दिले असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची जडणघडणवी यासाठी बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक अशा विविध पैलूंचा विकास होण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती सांगितली. सरपंच मनीषाबाई भील यांनी विद्यार्थ्यांना ग्रामविकासात विशेष लक्ष देण्याविषयी आवाहन केले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या ग्रामसेविका वैशाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना सात दिवशी निवासी शिबिराच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना समाज कार्याविषयीचे महत्व सांगितले. उपसरपंच सुरेश पाटील यांनी निवासी शिबिरात काही अडचणी आल्यास संपूर्ण गाव आपला सहकार्य करेल असे आश्वासनही दिले. शिबिराच्या कालावधीत स्वच्छता मोहिमेत जे काही ग्रामपंचायतीकडून सहकार्य हवे असेल ते संपूर्ण सहकार्य मिळेल याची ग्वाही दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील सरांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन करावे व सात दिवसाच्या निवासी शिबिरात ग्रामस्थांना आपल्या विविध कार्यक्रमात आमंत्रण द्यावे, काही अडचणी भासल्यास ग्रामस्थांकडून ते आपण कशा सोडवाव्या याविषयीचे मार्गदर्शन केले. तसेच प्रा. डॉ.जी एस सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे व बालविवाह निर्मूलनाचे तसेच शिक्षण आरोग्य व युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजीत भाऊ भांडारकर यांनी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांनी विकास होण्यासाठी जे कार्यक्रम राबविले जातात, अशा सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे सुचवले. निवासी शिबिराच्या माध्यमातून गावकरी, पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, महाविद्यालयाचे कर्मचारी हे विद्यार्थ्यांसाठी उपस्थित राहून त्यांचा विकास साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात यावर मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी आणि कर्तव्य याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका निशिगंधा पाटील या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ अस्मिता सरवैया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन.एस.एस. स्वयंसेवक प्रसाद भावसार, गणेश कुंभार, तेजस पाटकरी, गायत्री महाजन, निखिल पाटील व सगळ्या एनएसएस स्वयंसेवकांनी सहकार्य केले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.