अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात “राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने “भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त” दि. 9 ऑगस्ट या दिवशी “ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन” आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले, याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी “ऑगस्ट क्रांती दिन” आणि “जागतिक आदिवासी दिन” या दोन्ही दिवसांचे ऐतिहासिक महत्त्व मांडले. तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पवन पाटील यांनी केले. तसेच दि. 10 ऑगस्ट रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले, प्रा. व्ही. डी. पाटील, प्रा. डॉ. संजय महाजन, प्रा. डॉ. पवन पाटील, प्रा. डॉ. सतीश पारधी, प्रा. डॉ. जितेंद्र माळी, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हजर होते. यावेळी सर्वांनी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. तद्नंतर “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच दि. 12 ऑगस्ट रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “रांगोळी स्पर्धेचे आयोजन” करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सुंदर अशा स्वातंत्र्य अमृत महोत्सवासंदर्भात रांगोळ्या काढल्या. रांगोळी स्पर्धा सुरू होण्याअगोदर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या रांगोळी स्पर्धेच्या परीक्षक म्हणून प्रा. डॉ. नंदा कंधारे, प्रा. व्ही. डी. पाटील, प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा. डॉ. सतीश पारधी, प्रा. दिलीप कदम आदींनी काम पाहिले. अशा प्रकारे मारवड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त” विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि. 15 आॅगस्ट पर्यंत “भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर निबंध स्पर्धा” वकृत्व स्पर्धा, “देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा” अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. एकंदरीत सर्व कार्यक्रमांसाठी रासेयो स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी सहकार्य करीत आहेत.