अमळनेर:- नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमतर्फे आदर्श गुरुजन पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गुरूला म्हणजेच शिक्षकाला आदराचे स्थान दिले आहे. शिक्षक राष्ट्रासाठी सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य करतो. गुरुचे अनेक रूप आहेत.त्यापैकी एक म्हणजे शिक्षक आहे. भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून त्यांच्या कार्याची जनजागृती व्हावी आणि शिक्षकांना भविष्यात राष्ट्रासाठी चांगले नागरिक घडविण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने “नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमतर्फे आदर्श गुरुजन पुरस्कार 2022” आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी पुरस्कारासाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांचे नामांकन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट असून अधिक माहितीसाठी नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे महाराष्ट्र अॅडिशनल डायरेक्टर जनरल व तालुक्यातील डांगरी येथील रहिवासी प्रमोद रमेश पाटील (9881194816) यांच्याशी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर पुरस्कार सोहळा ४ सप्टेंबर रोजी धुळे येथे वितरण करण्यात येणार आहे.