अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात “भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे” औचित्य साधून दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी ध्वजारोहण समारंभाबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी गावात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. तद्नंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण मा. जिल्हा परिषद सदस्या प्रभावतीताई जयवंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील, ए.पी.आय जयेश खलाणे, पी.एस.आय विनोद पाटील तसेच संस्थेचे उपाध्यक्ष देविदास शामराव साळुंखे, सचिव देविदास बारकू पाटील, युवराज काशिनाथ पाटील, डॉ. सुरेश मन्साराम साळुंखे, साहेबराव नारायण पाटील, मनोज हिंमतराव पाटील व संचालक मंडळ, मा.जि.प. सदस्य शांताराम पाटील, माजी प्राचार्य हरीभाऊ मारवडकर, खासेराव आबा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले. ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एल.जे.चौधरी, पो हेड कॉन्स्टेबल बागवान तसेच गावातील विविध पदाधिकारी व मान्यवर, जेष्ठ नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना “व्यसनमुक्तीची शपथ” देण्यात आली. तद्नंतर महाविद्यालयातील “राष्ट्रीय सेवा योजना” एककाच्यावतीने आयोजित केलेली “रांगोळी स्पर्धा”, विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ” बॅनर स्पर्धा”, शब्दगंध विभागाची “भित्तीपत्रके स्पर्धा” अशा विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळ्या, बॅनर आणि भित्तीपत्रके यांचे तोंड भरून कौतुक केले. तर प्रमुख अतिथीनी व संस्था अध्यक्षांनी रांगोळी, बॅनर व भित्तीपत्रकांजवळ उभे राहून विद्यार्थ्यांसोबत सेल्फी घेतली. तसेच भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मान्यवरांनी प्राचार्यांशी चर्चा करून महाविद्यालय राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.
अशा प्रकारे मारवड महाविद्यालयात “भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आले. सर्व कार्यक्रमांसाठी महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.