सा. बां. विभागाला चंद्रकांत कंखरे यांनी दिले निवेदन…
अमळनेर:- शहरातील ताडेपुरा परिसरात गतिरोधक बसविण्याची मागणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाला चंद्रकांत कंखरे यांनी निवेदन दिले आहे.
राज्य महामार्ग क्र. ६ हा शहरातील ताडेपुरा परिसरातुन जातो.सदर परिसर दाट वस्तीचा व वर्दळीचा असून अनेक शेतकरी, मजूर, विद्यार्थी व नोकरवर्ग कामानिमित्त पायी प्रवास करत असतात. या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर वाहने सुसाट वेगाने जात असल्यामुळे परिसरातील नागरिक, शाळकरी मुले, शेतमजूर, वृद्ध, जीव मुठीत ठेवून चालत असतात. या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत जात असून अपघातामुळे परिसरातील 2 लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. त्यामुळे नागरिकांमधुन गतिरोधक बसविण्याची मागणी वाढत असून त्या मागणीला प्रतिसाद देत भाजपा उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे यांनी पत्राद्वारे मुख्य अभियंता, अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कडे त्या रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, ताडेपुरा भागातील मयूर धनगर, दिनेश बागळे, राहुल कंजर, विकास कंजर आदी उपस्थित होते.