
तालुक्यातील इंदापिंप्री येथे घडली घटना…
अमळनेर:- तालुक्यातील इंदापिंप्री येथील रहिवासी संजय वेळूमन पाटील (वय ४२) यांनी २० ऑगस्ट रोजी शेतात निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शेतकरी संजय पाटील हे आडगाव ता. यावल याठिकाणीं पत्नी व मुलाबाळासह राहत होते. आईला भेटण्यासाठी ते गावी आल्याची माहिती असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त जात आहे. नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शेतकरी संजय पाटील यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पो.कॉ कैलास शिंदे करीत आहे.




