
किरकोळ कारणावरून वाद, पोलीसात तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील तरवाडे येथे किरकोळ कारणावरून वाद घालत एकास लोखंडी रॉडने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याने मारवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २३ ऑगस्ट रोजी तरवाडे येथील प्रवीण रमेश वाघ याने घराच्या पुढे राहणाऱ्या संजय लालचंद भील यास घराजवळील रस्त्यावर लहान खेळत असून गाडी हळू चालवत जा असे सांगितले. मात्र मी कोणाला घाबरत नाही, माझे कोणी वाकडे करू शकत नाही असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर २४ रोजी फिर्यादी अंगणात उभा असताना संजय लालचंद भील व मल्हारी लालचंद भील यांनी चापटाबुक्क्यानी व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, इतरांनी हे भांडण सोडविले. त्यावरून मारवड पोलीसात भादवि कलम ३२४, ३२३, ५०४,५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे. काँ. भरत ईशी हे करीत आहेत.




