प्रयोगशील शिक्षकांचा प्रमाणपत्र देवून केला सत्कार…
अमळनेर:- पंचायत समिती तर्फे आयोजित तालुक्यातील देवळी येथिल सरस्वती आयटीआय व साई कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ९४ शाळांनी सहभाग घेतला. प्रदर्शनाचे उदघाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रकाश पाटील होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, शापोआ अधीक्षक भटू बाविस्कर, सरपंच अशोक पाटील, संदीप घोरपडे , शिक्षण विस्तार अधिकारी पी डी धनगर, पालिका प्रशासन अधिकारी दीपाली पाटील, कल्पना वाडीले, पंचायत समिती माजी सदस्य विनोद पाटील, निवृत्ती बागुल, रत्नमाला कुवर हजर होते. यावेळी व्ही स्कूल ऍप मध्ये शैक्षणिक व्हीडिओ व शैक्षणिक प्रयोग करणाऱ्या शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आमदार अनिल पाटील म्हणाले की विद्यार्थी कल्पक असतात त्याची जिज्ञासू वृत्ती, कल्पना शक्ती जागृत असली की त्यातून नवीन संशोधन निर्माण होते. विद्यार्थ्यांनी निरीक्षण शक्ती केंद्रित केली तर जगाच्या समस्यांवर विज्ञानातून उपाययोजना करता येते. जो प्रयत्न करेल तोच यशस्वी होतो. विद्यार्थ्यांना चांगला शिक्षक मिळाला तर विद्यार्थ्यांची प्रगती होते. माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील म्हणाले की, कोणतेही शिक्षण न घेता विविध पदार्थ एकत्र शिजवून चविष्ट पदार्थ तयार करणारी आई सर्वात मोठी वैज्ञानिक असते. संदीप घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
इयत्ता ६ ते ८ उच्च प्राथमिक एक गट व ९ ते १२ माध्यमिक व उच्च माध्यमिक असा दुसरा गट ठेवण्यात आला होता.विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, मोबाईल ऍप च्या माध्यमातून उपयुक्त कामांची सुविधा, तंत्रज्ञान आणि खेळणी यावर भर दिला होता. शिक्षकांनी देखील गणितीय उपकरणे तयार केली होती. परीक्षक म्हणून संजय पाटील, डी ए धनगर, सूर्यकांत बाविस्कर, नवनीत सपकाळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले. आभार निरंजन पेंढारे यांनी मानले. कार्यक्रमास केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, अशोक सोनवणे, दिलीप सोनवणे, प्रवीण वाणी, विश्वास पाटील, गजानन पाटील, मुख्याध्यापक तुषार बोरसे, प्रा अशोक पवार , मुख्याध्यापिका अनिसा शेख, ए बी धनगर, निरंजन पेंढारे, उमेश काटे, डी के पाटील, ललिता पाटील, माधुरी पाटील, नंदा पाटील, सुधीर पाटील, संदीप मोरे, दीपक महाजन हजर होते.