अमळनेर:- महेश नवमी हा माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणून साजरा केला जातो त्यामुळे अमळनेर येथील माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
माहेश्वरी समाजाच्या स्थापनेला 5176 वर्ष पूर्ण झाली आहेत,नवमीनिमित्त अमळनेरात भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते,शोभयात्रेत भगवान महेश यांचा देखावा सादर करण्यात आला होता,यात गोविंद पुष्कर मुंदडा याने भगवान शंकर यांची वेशभूषा साकारली होती, सदर शोभायात्रा वसई देवी चौकातून अर्बन बँक,महाराणा प्रताप मार्ग,पंजाब नॅशनल बँक, बोहरी पेट्रोल पंप येथून शिवाजी महाराज उद्यान जवळील महादेव मंदिरात सांगता झाली.यावेळी सर्व महिला व पुरुष बांधवानी महाआरती व प्रसादाचा लाभ घेतला.त्यांनतर श्री स्वामी नारायण मंदिर येथे महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला,यावर्षी महाप्रसादाचे मानकरी पोरवाल परिवार होते.कार्यक्रमाचे आयोजन माहेश्वरी समाजाचे तालुकाध्यक्ष पंकज मुंदडा, शहराध्यक्ष दिनेश मणियार, सेक्रेटरी गणेश कलंत्री, रामानंद गिलडा यांनी केले होते. कार्यक्रमास गोविंद मुंदडा, ओमप्रकाश मुंदडा,जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुंदडा,भोजराज बलदवा, अशोक मणियार,प्रा सुभाषचंद्र सोमाणी,नरेंद्र मुंदडा, हरकूलाल पोरवाल,दगडूलाल पोरवाल, प्रा सुरेश माहेश्वरी, किशोर मणियार,मधुसूदन लाठी, ओमप्रकाश मणियार, आकाश माहेश्वरी, हरिकीसन मुंदडा,महेश मुंदडा, किशोर लखोटीया, राकेश मुंदडा, शुभम मुंदडा, सुनील माहेश्वरी, अजय पोरवाल, अशोक मुंदडा,प्रकाश पोरवाल, परेश कलंत्री, राकेश माहेश्वरी,अमेय मुंदडा, पुरूषोत्तम भूतळा, नंदकिशोर झवर,मयूर झवर, विवेक लाठी, प्रीतेश मणियार, अभिनय मुंदडा, लालचंद सामरे, पुष्कर मुंदडा,योगेश गिलडा, संदीप बसेर,प्रदीप जेथलिया, किरण मणियार यासह समाजबांधव व व महिला मंडळ उपस्थित होते.