ॲड. उज्वल निकम यांचे मराठा समाज विद्यार्थी गौरव कार्यक्रमात प्रतिपादन…
अमळनेर:- आपण कितीही मोठया पदावर गेलात तरी नैसर्गिकपणा, माणुसकी विसरता कामा नये असे प्रतिपादन जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी येथील मराठा समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रमात केले.
अमळनेर शहरातील मराठा मंगल कार्यालयात अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे दुपारी 12 वाजता तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंवत पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल पाटील हे होते. यावेळी मराठा समाजातर्फे जेष्ठ विधिज्ञ निकम यांचा सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सन्मानपत्र वाचन आर जे पाटील यांनी केले. तर प्राध्यापक डॉ लीलाधर पाटील, आमदार अनिल पाटील, विद्यार्थ्यांच्या वतीने कुमुद देसले यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी देणगीदार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पार पडला. व्यासपीठावर माजी आमदार डॉ बी एस पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, जयवंत पाटील डॉ अनिल शिंदे, विनोद पाटील शिवाजीराव पाटील, जे पी पाटील, संजय पुनाजी पाटील, राजेंद्र देशमुख, विक्रांत पाटील, न्या गुलाबराव पाटील, महेंद्र बोरसे, प्रवीण पाटील, तिलोत्तमा पाटील ज्योती निकम, स्वप्निल पाटील, गौरव पाटील, श्याम पाटील रोहित निकम, बी झेड पाटील आदी उपस्थित होते.
जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी बोलताना सांगितले की, जीवनात आवश्यक आव्हाने स्वीकारा व स्वतःची ताकद निर्माण करा, समाजासाठी शिक्षण आवश्यक आहे. जीवनात काम करताना प्रामाणिकपणा जपला पाहिजे त्यातून मुळची नाळ विसरता कामा नये, तुम्ही कोणत्या आणि कोठे मोठ्या पदावर कार्यरत आला आहात याला महत्त्व नसून माणुसकी विसरता कामा नये, केव्हाही मोठ्या पदावर काम करत असताना प्रामाणिकपणा जपणे आवश्यक आहे. मराठा समाजातील सर्व व्यक्तींनी आपआपल्या पाल्यांमध्ये नैसर्गिक गुण विकसित करावे. आपण ज्या क्षेत्रात काम असतो त्यातील प्रेरणा आपल्या समाजाला असली पाहिजे त्यासाठी ध्येय निश्चित व विकसित करण्यासाठी आतापासूनच तयारी करायची असे मार्गदर्शन उज्वल निकम यांनी विद्यार्थ्यांना केले. कोणताही गुन्हा केलेला आरोपी हा कुठल्याही जाती-धर्माचा नसून तो आरोपी आहे हे सिद्ध करता आले पाहिजे अथवा तो निर्दोष आहे तर त्याचे निर्दोषत्व सिद्ध करता आले पाहिजे आरोपी हा कोणत्याही जाती-धर्माचा नसतो असेही यावेळी एड निकम यांनी केले. यावेळी अजमल कसाबचा खटला सुरू असताना एकदा अहिराणी भाषेततील वर्णन आपसूकच तोंडात कसे आले याचा किस्सा सांगितला.