गुर्जर बांधवांनी फेटा परिधान करून साजरा केला उत्सव…
अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे येथे हनुमान मंदिर प्रांगणात गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज जयंती व आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस निमित्ताने चक्रवर्ती सम्राट गुर्जर राजा मिहीर भोज राजा यांची प्रतिमा पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करून साजरा करण्यात आला, यावेळी नवतरुण व गुर्जर बांधवांनी फेटा परिधान करून आंतरराष्ट्रीय गुर्जर दिनाचा उत्सव साजरा केला.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाचा तृतीय तीथी ही धर्मरक्षक गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज गुर्जर यांची जयंती देशभरातील गुर्जर समाज बंधक आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्याचे आजचे तेरावे वर्षअसून भाद्रपद शुक्ल तृतीयाचे निमित्त साधून आंतरराष्ट्रीय गुर्जर दिनाचे आयोजन अखिल भारतीय वीर महासभेकडून करण्यात आले होते. त्यात पाडळसरे येथे झालेल्या कार्यक्रमात निम, कलाली, पढावद व तांदळी येथील गुर्जर बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंडित आबा गुर्जर हे होते तर प्रमुख पाहुणे गुर्जर भवन समितीचे माजी अध्यक्ष डॉक्टर एल डी चौधरी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भागवत पाटील, अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे राष्ट्रीय सोशल मीडिया अध्यक्ष तथा पत्रकार वसंतराव गुर्जर यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज गुर्जर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले, यावेळेस समाजातील मान्यवरांच्या विशेष निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे राष्ट्रीय सोशल मीडिया अध्यक्ष पत्रकार वसंतराव गुर्जर यांनी आंतरराष्ट्रीय गुर्जर दिनाचे महत्त्व विशद केले तर डॉक्टर एल डी चौधरी यांनी मिहीर भोज गुर्जर यांचा जिवन पट व इतिहासातील गुर्जर साम्राज्याची नोंदी विषद केल्या. यावेळी कार्यक्रमास माजी सरपंच रमेश गुर्जर , शिरीष चौधरी मित्र परिवाराचे रणछोड गुर्जर, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष मधुकर गुर्जर, माजी सरपंच सचिन पाटील, संदीप गुर्जर , शिवसेनेचे उप तालुका प्रमुख चंद्रशेखर गुर्जर ,विकास सोसायटीचे चेअरमन मंगल गुर्जर ,माजी चेअरमन डिगंबर गुर्जर , युवा सेनेचे ईश्वर गुर्जर आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरदार पटेल मित्र मंडळाचे निलेश गुर्जर, रामकृष्ण गुर्जर, विकास गुर्जर, गौरवकुमार गुर्जर, शुभम गुर्जर, समाधान गुर्जर, राधेश्याम गुर्जर, अलोक गुर्जर आदींनी परिश्रम घेतले.