विद्यार्थ्यांकडून जिमखाना फी आकारणी सुरू मात्र जिम तीन वर्षापासून बंद…
अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालयात जिमखाना फी आकारली जाते मात्र जिम गेल्या तीन वर्षापासून बंद असल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले.
विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रकिये दरम्यान भौतिक सुविधेच्या नावाखाली विविध प्रकारचे शुल्क आकारले जातात. त्यात जिमखाने साठी एका विद्यार्थ्या कडून दीडशे रुपये इतकी रक्कम आकारण्यात येते. सध्या महाविद्यालयात सुमारे साडे चार ते पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर दर वर्षी लाखो रुपये जिमखाना फी म्हणून जमा होतात. मात्र महाविद्यालयातील जिमखाना तीन ते चार वर्षांपासून बंद असून साहित्य धुळीत माखलेले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कडून महाविद्यालय प्रशासनाला सवाल करण्यात आला की, तीन ते चार वर्ष जिमखाना जर बंद आहे तर आपण विद्यार्थ्यांकडून कुठल्या आधारावर शुल्क आकारत आहात. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने जिल्हाध्यक्ष मा. भूषण भदाणे यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व प्रश्न घेऊन महाविद्यालयाच्या प्राचार्य व प्रशासनाला जाब विचारला. तर एका महिन्यात सदर जिमखाना व त्यातील मशिनरी दुरुस्त करून नव्याने सुरू करण्याचे आश्वासन या वेळी विद्यार्थ्यांना प्राचार्य यांनी दिले. एका महिन्यात जिमखाना सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना आकारण्यात आलेले संपूर्ण शुक्ल त्यांना परत देण्यात यावे अशी मागणी तालुकाध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे व शहराध्यक्ष सनी गायकवाड केली. या वेळी विद्यार्थी संघटनेचे कृष्णा बोरसे, गौरव पाटील, अतुल भदाणे,रोहन पाटील,आयुष पाटील,दीपक पाटील व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.