अमळनेर:- येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात डॉ. लीलाधर पाटील यांच्या पीएचडी शोध प्रबंधावर आधारित महात्मा फुले व ताराबाई शिंदे यांच्या कार्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख के. डी. पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष डी.डी. पाटील, युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेरचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, डॉ. ज्योती राणी (माजी प्राचार्य, प्रताप महाविद्यालय, अमळनेर) डॉ. एल. ए. पाटील (माजी प्राचार्य प्रताप महाविद्यालय, अमळनेर), मा. संदीप घोरपडे, नगरसेवक हे देखील उपस्थित होते. धनदाई महाविद्यालयात इंग्रजी विभाग प्रमुख कार्यरत असलेले डॉ. लीलाधर पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील इंग्रजी विषयातील Ph.D. पदवी प्राप्त झाली. त्याच्या संशोधनाचा विषय ‘Construction of Subaltern discourse in the writings of Jyotirao Phule and Tarabhai Shinde’ हा होता. त्यांच्या संशोधनाचा उपयोग विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, संशोधकांना व्हावा या उद्देशाने महाविद्यालयातील स्टाफ अकॅडमी व युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार सर यांनी केले. त्याचबरोबर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर डॉ. ज्योती राणे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. महात्मा फुले व ताराबाई शिंदे यांचे लिखाण हे सामाजिक क्रांती घडवून आणणारे आहे. त्याचबरोबर शोषित आणि वंचित बहुजनांमध्ये आत्मसन्मानाची भावना जागृत करणे हा महात्मा फुले व ताराबाई शिंदे यांच्या लिखाणाचा व कार्याचा उद्देश होता असे प्रतिपादन डॉ. लीलाधर पाटील सर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टाफ अकॅडमी प्रमुख प्रा. मीनाक्षी इंगोले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत पाटील यांनी केले.या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, अमळनेर शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर, अमळनेर शहरातील नागरिक त्याचबरोबर आधार बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्या आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.