
सावखेडा निमगव्हाण पुलाजवळ दिला गणरायाला निरोप…
मुंगसे ता.अमळनेर:- सूर्यकन्या तापी नदीत सावखेडा निमगव्हाण तापी पुलावरून तसेच जय श्री दादाजी धुनिवाले बाबांच्या मंदिराच्या पायथ्याशी खाली उतरून दुचाकी व चारचाकी वाहनांवर येऊन चोपडा व अमळनेर तालुक्यातील अनेक भाविकांनी गणरायाला निरोप दिला.

तापी नदीवरील सावखेडा निमगव्हाण पुलावरून गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी, सातव्या दिवशी ‘व अनंत चतुर्दशीच्या नवव्या दिवशी गणरायाची मनोभावे पूजा करत निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी असंख्य भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी ढोल ताशांच्या गजरात तापी -नदी वर आणून गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या ! घोषणांच्या निनादात निरोप देण्यात आला . व गणपती विसर्जन गणपतीच्या आरतीने पूजाअर्चा करून गणेशाला वंदन करून ‘तापी नदीत विसर्जन करण्यात आले. या वेळी अमळनेर पो.नि. जयपाल हिरे, चोपड़ा ग्रामीणचे पो.नि. देविदास कुंगर, शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.