कृषी विभागातर्फे ढेकूसिम येथे विविध योजनांबद्दल केले मार्गदर्शन…
अमळनेर:- एक दिवस माझ्या बळीराजासाठी योजनेअंतर्गत कृषी विभागातर्फे ढेकूसिम येथे विविध योजनांबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
ढेकूसिम येथील आदर्श शेतकरी किरण एकनाथ पाटील यांच्या प्रक्षेत्रावर दि.15 सप्टेंबर रोजी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या योजनेअंतर्गत कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी तालुका कृषी अधिकारी वारे यांनी विविध योजने विषयी सविस्तर मार्गदर्शन मार्गदर्शन केले. तसेच मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.व सदर योजनेची माहिती दिली . तसेच कृषी पर्यवेक्षक दीपक चौधरी यांनी पिएमएफएमई योजनेविषयी महिला बचत गटांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कृषी पर्यवेक्षक वंजारी यांनी ऑनलाइन महाडीबीटी विषयी सविस्तर माहिती दिली. आर एच पवार यांनी जैविक कीटकनाशक ट्रायकोडर्मा बुरशीनाशक यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भूषण पाटील यांनी सेंद्रिय शेती विषयी माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक वाय जी कदम यांनी कापूस पिकावर माहिती दिली. तसेच यावेळी सरपंच भालचंद्र जाधवराव पाटील, उपसरपंच राजेंद्र हनुमंत पाटील, पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य महिला शेतकरी वर्ग उपस्थित होते. तसेच आदिवासी प्रकल्प अंतर्गत अंबासन गावात जाऊन बीज प्रक्रिया औषधी वाटप करण्यात आली. तसेच महाडीबीटी अंतर्गत घेतलेल्या अवजारांची तपासणी करण्यात आली. तसेच पोकरा योजनेअंतर्गत दिवानजी खुशाल पाटील, अंबासन यांचे शेतात तुती लागवड प्रकल्पास भेट दिली. सर्व कृषी सहाय्यक कर्मचारी वृंद एस एस वानखेडे वाय एल खैरनार अजय पवार तसेच महिला कर्मचारी निशा सोनवणे, पुनम पाटील, सुप्रिया पाटील, कविता बोरसे, योगिता लांडगे, नलिनी पाटील, दिपाली सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.