मारवड येथे पिकांच्या वाणांबद्दल केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे शालिग्राम सिड्सच्या वतीने कापूस पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मारवड येथील शेतकरी बापू आनंदराव कोळी यांच्या शेतात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन डांगरी येथील शेतकरी लोटन आधार पाटील यांच्या हस्ते करत सुरुवात करण्यात आली. कंपनीचे सर्वेसर्वा शालिग्राम बी निकम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देत सांगितले की, “कंपनीचे रिशी ७७७, रिशी १, रिशी स्टार असे तीन वान असून भरघोस उत्पन्न देणारे असून तसेच या वानांना फवारणी कमी लागते तसेच रोगराईला पिके बळी पडत नाही.” तसेच कंपनीच्या विविध उत्पादनांबद्दल माहिती दिली. यावेळी डांगरी येथील माजी सरपंच अनिल शिसोदे यांनी या वाणांच्या २ वर्षाच्या अनुभवाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच लागवड व विविध प्रक्रिया बद्दल बहुमूल्य मार्गदर्शन केले. शालिग्राम सिड्स हे खानदेशातील उत्पादन असून तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या वाणाचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मारवड, डांगरी, गोवर्धन, बोरगाव, वावडे, बोहरा, खेडी वासरे, धानोरा, करणखेडा, निम, कळमसरे यासह परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थिती देत बापू कोळी यांच्या शेतात रिशी ७७७ या वाणाच्या कापसाच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालिग्राम सिडस च्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.