अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रा.विलास गावीत यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे नुकतीच ‘पीएच.डी’ पदवी प्रदान करण्यात आली.
‘आदिवासी स्त्रियांच्या मराठीतून प्रकाशित ललित आणि ललितेतर साहित्याचा अभ्यास’ या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना क.ब. चौ.उ.म. विद्यापीठाच्या भाषा- अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या मराठी विभागातील प्रा.डॉ. आशुतोष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा.विलास गावीत यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या चौकी सारख्या लहानशा गावातून अत्यंत संघर्षातून व प्रतिकूल परिस्थितीतून आपली शिक्षणाची सुरुवात केली. त्यांनी यापूर्वी सेट-नेट परीक्षेतही यश मिळविले आहे. प्रा.विलास गावीत यांच्या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांसह
चिटणीस डॉ.ए.बी.जैन, प्रभारी प्राचार्य डॉ.पी.आर.शिरोडे, उपप्राचार्य, डॉ. एम. एस.वाघ, डॉ.जी.एच.निकुंभ, डॉ.जे.बी. पटवर्धन,डॉ.जयेश गुजराथी, डॉ. कल्पना पाटील, मराठी विभाग प्रमुख डॉ.रमेश माने,मराठी विभागातील प्रा.ज्ञानेश्वर कांबळे, प्रा.योगेश पाटील,प्रा. किरण कुमार पाटील, ज्ञानेश्वर खलाणे, प्रा.प्रतिभा पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधू-भगिनींनी त्यांचे अभिनंदन केले.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024