उत्पन्नात घट येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका…
अमळनेर:- तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूर्व हंगामी कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असून बळीराजाला मोठा फटका बसणार आहे.
अति पावसाने पूर्व हंगामी कापूस पिकाचे झाडाच्या खालच्या भागाच्या कैऱ्यांच्या दर्जा खालावला आहे. बोंडे सडकी काळवंटलेली पडल्याने पहिल्या वेचणीलाच कापसाचा दर्जा घसरणार असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे याशिवाय अति पावसाने बाजरी, मका, सोयाबीन आदी पिके वाऱ्याने झोपली असून पिके ही खराब झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. जूनच्या सुरुवातीला व मे अखेरीस लागवड केलेल्या कपाशीच्या ऑगस्ट महिन्यातच कैऱ्या तयार झाल्या परंतु सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाला सतत पाऊस सुरू होता यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले खालच्या भागाच्या बोंडांचे नुकसान झाले त्या काळवंडल्या आहेत तसेच लाल पडून त्यांचा दर्जा घसरलेला आहे. त्यात कवडीची समस्या तयार होणार असून कापूस लालसर काळा पडणार आहे. त्यामुळे दर्जाचे कारण पुढे करून कोडीमोल दरात कापसाची खरेदी करण्याचा प्रकार सुरू होईल हा प्रकार शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा आहे या कापसाची वेचणी करण्यासाठी मजुरी देखील अधिक लागते. यंदाही सुरुवातीला अडीचशे ते तीन शे रुपये रोजाने कापूस वेचणीसाठी द्यावा लागत आहे तसेच सध्या ढगाळ हवामान आहे यामुळे बोंडे व्यवस्थित उमलनार नाहीत अशी स्थिती आहे अति पावसामुळे यंदाही पूर्व हंगामी कापसाची 30 ते 35 टक्के नुकसान झाले आहे गेल्या वर्षी देखील अशी समस्या अति पावसामुळे निर्माण झाली होती यंदाही अशीच परिस्थिती असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024