अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा गावानजीक गावठी दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.
सपोनि जयेश खलाने यांनी दिलेल्या माहितीनुसार पो.उ.नि. विनोद पाटील, हे. कॉ. संजय पाटील, हे कॉ. विशाल चव्हाण, पो. कॉ. अनिल राठोड यांनी निंभोरा गावानजीक चिखली नदीजवळ भेट दिली असता इसम नामे बशीरशाह उस्मानशाह फकीर हा प्लास्टिक कॅन घेवून दारू विक्रीच्या उद्देशाने दिसून आला. छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागल्याने तो काटेरी झाडाझुडपातून पळून गेला. त्याठिकाणी १२०० रुपये किमतीची ३० लिटर दारू मिळून आली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला. सदर दारू विक्रेत्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ. संजय पाटील हे करीत आहे.