
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे सट्टा जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकत एकास ताब्यात घेतले असून मारवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पो. कॉ. गणेश पाटील, हे. कॉ. मेघराज महाजन, हे. कॉ. प्रवीण बेलदार, हे. कॉ. योगेश पाटील यांच्या पथकाने मांडळ येथे छापा टाकला असता राहुल सुक्राम भोई हा मिलन नावाचा सट्टा घेताना १२६० रू. किमतीच्या मुद्देमालासह आढळून आला. त्यावरून मारवड पोलीसात मु. जू. अँक्ट १२ (अ) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे. कॉ. फिरोज बागवान हे करीत आहेत.




