अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथे गावठी दारू विक्रेत्यावर मारवड पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपोनि जयेश खलाने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हे. कॉ. भरत इशी, पो. कॉ. दिनेश पाटील, पो. कॉ. तुषार वाघ यांनी शिरसाळे येथे भेट दिली असता इसम नामे चुडामन आधार कोळी हा प्लास्टिक कॅन घेवून बसलेला दिसून आला. त्याच्यावर छापा टाकण्यास गेले असता पोलिसांची चाहूल लागल्याने तो पळून गेला. मात्र त्या ठिकाणावर ६०० रू. किमतीची १५ लिटर गावठी दारू मिळून आली. नमुने घेवून उर्वरित दारू नष्ट करण्यात आली. आरोपीविरुद्ध दारूबंदी अधिनियम ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.