
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथे सट्टा घेणाऱ्या एकास मारवड पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
एपीआय जयेश खलाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हे. कॉ. संजय पाटील, सुनील अगोणे, अनिल राठोड यांच्या पथकाने अमळगाव येथे भेट दिली असता गावातील मरीआई मंदिराच्या पाठीमागे रंगराव शामराव कोळी हा लोकांकडून सट्टा घेताना दिसून आला. त्याच्यावर छापा टाकून रंगेहाथ पकडले असता त्यांचेकडून ३३० रुपयाची जुगाराचे साहित्य मिळून आले. मारवड पोलीसात मु. जु. अँक्ट १२ अ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.




