सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- जवळ असलेल्या गडखांब नगावच्या मध्यभागांतून जाणाऱ्या चिखली नदीच्या आश्रम शाळेच्या मागील बंधाऱ्यात गडखांब येथील तेरा वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी उघडकीस आली.
स्थानिक प्राप्त माहितीनुसार, गडखांब येथे राहणारा व आश्रमशाळेतला इयत्ता सातवी वर्गाचा विद्यार्थी चि. अमित घुबड्या सोळंखे (वय-13) हा गुरुवार रोजी शाळेत जातो म्हणून मित्रांसोबत घरातुन निघाला आणि आश्रमशाळेच्या मागील बाजूस असलेल्या चिखली नदीच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला. पोहता पोहता तो बुडाला.तो शाळेत न आल्याने पालकाने त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो कुठंही आढळून आला नाही. शुक्रवार रोजी नदी परिसरात शोध घेतला असता त्याचा मृतदेह नदीच्या बंधाऱ्याजवळ दिसून आला. त्याचा मृतदेह बघून कुटुंबाने हंबरडा फोडला. आई-वडील गडखांब येथे मोलमजुरी साठी वास्तव्यास होते. आणि अमित हा आश्रमशाळेत इयत्ता सातवी वर्गात शिकण्यास होता.आणि ये-जा करीत असल्याचे समजते. झालेल्या दुदैवी घटनेने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत होते.