उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन वर्ग संपन्न…
अमळनेर:- तालुक्यातील अंतूर्ली रंजाने येथे कृषी विभागातर्फे मार्गदर्शन वर्ग घेत बीज प्रक्रियेचे महत्व शेतकऱ्यांना समजावण्यात आले.
उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, व कृषी सहायक दिनेश पाटील यांच्या संकल्पनेतून विजयादशमीच्या दिवशी रब्बी हंगामात बीज प्रक्रियेचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन वर्ग संपन्न झाला. यावेळी दिनेश पाटील यांनी सोन्यासारखा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचे बीज प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले. बीज प्रक्रिया म्हणजे काय? बीज प्रक्रिया कशी करावी ? बीज प्रक्रियेचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जाधवर यांनी उपस्थित शेतकरी बंधूं कडून यापुढे बीज प्रक्रिया केल्याशिवाय कुठल्याही बियाण्यांची मी शेतावर पेरणी करणार नाही अशी शपथ वदवून घेतली. वारे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार, कृषी पर्यवेक्षक वंजारी व कृषी सहायक एम जी पवार यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक राहुल किशोर पाटील व रंजाने व अंतुर्ली येथील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.