तर धार येथील वृद्धाची गळफास घेवून आत्महत्या…
अमळनेर:- तालुक्यातील धार येथील ७० वर्षीय इसमाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली आहे. तसेच तालुक्यातील सारबेटे खु. येथील तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धार येथील दयाराम तामु भील (वय ७०) याने पडत्या घरात पत्र्याच्या अंगलला साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे. कॉ. मुकेश साळुंखे हे करीत आहेत.
सारबेटे खु. येथील तरुणाने केली रेल्वेखाली आत्महत्या…
सारबेटे खु. येथील तुषार भावराव देवरे असे या मयत तरुणाचे नाव असून त्याने चोपडा रेल्वे गेट जवळ धावत्या रेल्वेसमोर उडी घेत जीवनयात्रा संपविली आहे. सदर इसम शिरुड येथील माध्यमिक शाळेत शिपाई पदावर कार्यरत होता. अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो सुनील पाटील हे करीत आहेत.